✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे (दि.11 एप्रिल) :- फॅशन शो जगात पदार्पण करताना रियान प्रोडक्शनच्या ब्रॅन्ड आणि लोगो चा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात, हडपसर पुणे येथे पार पडला. या सोहळ्यात रियान प्रॉडक्शनच्या सर्वेसर्वा अभिनेत्री व मॉडल मा. रेश्मा पाटिल यांनी नेत्रदीपक अस नियोजन केले.ऑर्गनायझर टीम महणून मिस्टर ग्लॅम युरेशिया इंटरनॅशनल मा. रोहित शिंदे, मा.मिस्टर एलिगंट आयकॉन ऑफ महाराष्ट्र आहान देवडीगा, मा. शंकर भड़कवाड संस्थापक व अध्यक्ष आलवसा फाऊंडेशन / छत्रपती फाऊडेशन व ए. एफ. पी प्रॉडक्शन, सागर झुरंगे यांनी उत्तम सहकार्य केले.
या प्रसंगी विविध टायटल विजेते विनर यांनी वेलकम रनवे वॉक सादर केला व आपली कला प्रदर्शित केली. मेघना आडसूळ ‘मिस लिटील पॅसिफिक वर्ल्ड २०२२ या चिमुकलीने आपल्या नृत्य आणि अभिनयाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच महाराट्रातील विविध भागातून आलेल्या होतकरू मॉडल यांना फ्रि रनवे साठी संधी देण्यात आली.कलाकार व मॉडेल पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले स्नेहा उत्तम मडावी यांचा सत्कार करण्यात आले
या प्रसंगी मा. अक्षय मोरे, योगेश पवार, प्रसाद खैरे, पंकज शर्मा, मकरंद दांडेकर, छाया प्रकाश, रोहित पवार, चिराग चौधरी, पुजा वाघ, व इतर मान्यवर उपस्थित होते.अपले मनोगत मांडताना मा. रेश्मा पाटील यांनी, ज्या लोकांना हा प्लॅटफार्म मिळत नाही, पण इच्छा आहे अशा विशेषतः विदवा महिलांसाठी विशेष प्लॅटफार्म उपलब्ध करून देणार व त्या माध्यमातून महिला सबलीकरण यासाठी कार्य करणार अशी ग्वाही दिली.
आणि लवकरच मिस, मिसेस, मिस्टर, किड्स महाराष्ट्राचे नेक्स्ट फॅशन सुपर मॉडल 2023. या नावाने शो करणार आहोत. या शो मध्ये नवतरुणांना पोत्साहनपर संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे मत मांडत सर्वांचे आभार मानले.आभिनेत्री रेश्मा पाटील यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा