✒️ शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.21 मे ) :- राज्य परिवहन आगार वरोरा येथे दि. १९.०५.२३ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. आगार व्यवस्थापक रा.प.वरोरा श्री मनोज डोगरकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण करणे व प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध देण्याकरिता व तसेच राज्य परिवहन महामंडळाला उपाययोजना सुचविण्याचा उद्देशाने विश्वासू प्रवासी संघटना समितीची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की बसस्थानक परिसरात प्रवाश्यांना पद्धतशीरपणे चढता उतरता यावे.यासाठी रांग पध्दतीची रचना करण्यात यावी.
बस स्थानकावर साफसफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करावी. लांब पल्ल्याच्या गाड्या बस स्थानकावर आल्या पाहिजेत.बस स्थानकावर प्रवाश्यांना स्वच्छ व ठंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे.तसेच बस स्थानकावरील वाढत्या चोर्या लक्षात घेऊन तेथे दोन महिला व दोन पुरुष पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी. यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
प्रवासी संघटना समितीच्या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष- श्री.ना.गो.थूटे जेष्ठ साहित्यिक तथा माजी मुख्याध्यापक कर्मवीर विद्यालय वरोरा, उपाध्यक्ष-श्री दिपक घूडे, मिडिया सल्लागार वरोरा,सचिव- डॉ. प्रशांत खुळे प्राचार्य लोकमान्य महाविद्यालय वरोरा, सहसचिव- ॲड.विनायक वानखेडे वरोरा, समिति चे सदस्य म्हणून श्री देवराव कांबळे सेवानिवृत्त अध्यापक, सादिक थैम ( पत्रकार) लोकमत समाचार, वरोरा तथा सामाजिक कार्यकर्ते,श्री रमेश मेश्राम सामाजिक कार्यकर्ते, श्री विजय गोटे, सहकार भारती जिल्हाध्यक्ष तथा संचालक विदर्भ महिला क्रेडिट कॉ. सोसायटी, वरोरा.
श्री.कीसन चौधरी माजी वाहतूक नियंत्रक,वरोरा. प्रतिभा जूलमे (महिला सदस्य)
समाजसेविका वरोरा, रेखा बंडू जी तेलतूंबडे समाजसेविका वरोरा यांची निवड करण्यात आली. या बैठकीचे आयोजन वरोरा आगार प्रमुख श्री मनोज बाबा डोंगरकर, वर्षा इंगळे यांनी केले.