✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.18 जानेवारी) :- लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या मोखाळा येथे घेण्यात आलेल्या विशेष शिबिराचा समारोप गुरुवार दि.१६ जानेवारी झाला.हे शिबिर दि १० ते १६ जानेवारी दरम्यान “माझा विकसित भारत, डिजिटल साक्षरता आणि मतदार जनजागृतीकरिता युवाशक्ती शिबिर” या संकल्पनेवर आधारित होते.
या समारोप कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोकमान्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शास्त्री होत्या.तर प्रमुख अतिथी आमदार करण देवतळे हे होते.तसेच प्रा.विश्वनाथ जोशी(कार्यवाह, लोकशिक्षण संस्था ), डॉ.ब्रह्मदत्त पांडेय, विकास घुडे ,राजू डाऊले(ग्रामसेवक,अनिता गडमडे(सरपंच ),भोगेकर
( उपसरपंच) ,विठठल फ़ोपरे,मंगला पोटे, बबलू खिरटकर,दारुंडे याप्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे शिबिरार्थीनमध्ये सहजीवन कौशल्य व समाजसेवेची आवड निर्माण करणारे केंद्र आहे असे प्रतिपादन याप्रसंगी आमदार करणज देवतळे यांनी केले.तसेच मागील काही वर्षात या विधानसभा क्षेत्रातील रखडलेल्या कामांची पूर्तता होणार यासंदर्भात हमी दिली आणि निवडणुकीत प्रचंड सहकार्य केले त्याबद्दल उपस्थितांचे खूप आभार मानले.
सामाजिक स्वास्थ व माझा विकसीत भारत हा संकल्प पूर्ततेकरिता माहिती तंत्रज्ञानाचा वापर,पर्यावरणाचा छान सांभाळ, शिबिराचा लाभ विद्यार्थ्यांनी सार्थक करावा,इत्यादी विषयाअनुषंगाने मान्यवरांनी स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.तसेच सुहानी जांभुळे,निशा कौरासे, समीक्षा उपरे या तीन स्वयंसेवीकांनी प्रतिनिधीक स्वरूपात शिबिरात आलेला अनुभव या प्रसंगी मांडले. गावकऱ्यांच्या वतीने शुभम फोपरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सात दिवसीय शिबिरात आरोग्य शिबर घेण्यात आले. यात महिलांमधील कर्करोग या मुख्य निदानाबरोबरच सामान्य आरोग्यबाबत १५० रुग्णांनी या सेवेचा फायदा घेतला.तर पशुविभाग पंचायत समिती वरोरामार्फत पशुचिकित्सा शिबिरात २५० जनावरांची तपासणी करण्यात आली.
बौद्धिक सत्रात सुवर्णरेखाताई पाटील यांनी “कॅटरिंग व्यवस्थापन व रोजगार संधी”,प्रा. भूषण लालसरे यांनी “डिजिटल साक्षरता”,प्रा.लीना पुप्पलवार यांनी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”,मुजदार अली यांनी “साइबर गुन्हेगारी”या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. “माझा विकसित भारत “या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन,तर “मोबाईलचा वाढता वापर सोयीचा की धोक्याचा ? या विषयावर वादविवाद स्पर्धा, विषय पूर्तता स्पर्धा,सविधान अमृत महोत्सवानिमित्त संविधान सन्मान रॅलीचे आयोजन शिबिरात करण्यात आले होते.
दोन दिवस राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच समाज प्रबोधनकारांचे मनोरंजनात्मक प्रबोधन कार्यक्रम(जय गुरुदेव नाट्यकला मंडळ, सप्त खंजिरी वादक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार रविभाऊ इंगोले यांचे जाहीर कीर्तन,शिवछत्रपती नाट्यकला प्रबोधन मंडळ,दहेगाव ) उत्साहात पार पडले.तसेच रोज सकाळी ८ते ११ या वेळात श्रमदानातून सार्वजनिक पांदण रस्ता व नाली तयार करण्यात आली.
या समारोप कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीकांत पुरी,प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. रवींद्र शेंडे (कार्यक्रम अधिकारी,राष्ट्रीय सेवा योजना) तर आभार प्रदर्शन डॉ.श्रीनिवास पिलगुलवार(समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता” उठे समाज के लिये उठे “या ध्येय गीताने झाली.या समारोप कार्यक्रमाला मोखाळा ग्रामस्थ,महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवकांचे सहकार्य मिळाले.