🔹प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
🔸चंद्रपुर जिल्ह्यातून कुणाल ढोक, प्रिया जावरे,भुपेश निमजे, क्रांतीविर सिडाम,रिनेश पाटील हे युवक उपस्थित
✒️चंद्रपूर(विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)
चंद्रपुर(दि.22जानेवारी):-नेहरू युवा केंद्र संघटन, युवा आणि खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून 12 ते 16 जानेवारी 2023 दरम्यान हुबळी -धारवड (कर्नाटक राज्य) येथे देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय युवा महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोमाई, केंद्रीय युवा कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.या वर्षातील युवा महोत्सवाची थीम “विकसित युवा -विकसित भारत” हे होती यात चंद्रपुर जिल्ह्यातून कुणाल ढोक, प्रिया जावरे,भुपेश निमजे,क्रांतिवीर सिडाम,रिनेश पाटील हे युवक उपस्थित होते.
या महोत्सवात देशभरातील 7500 हून अधिक युवक विविध राज्यातून सहभाग घेतला असून यामध्ये प्रामुख्याने योगा, युवा संवाद, क्रीडा पारंपारिक नृत्य, संगीत, खानपान, इत्यादी कलाकृतीच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या युवा महोत्सवात चंद्रपुर जिल्ह्यातील युवक युवा संवाद, योगा, आणि साहसी खेडा मध्ये मध्ये सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे पाच दिवसीय सत्रात जिल्ह्यातील युवकांनी विविध वेशभूषा साकारून देशभरातून आलेल्या युवकांकडून त्यांची संस्कृती, वेशभूषा, पेहराव, बोलीभाषा, खानपान, संगीत सण उत्सव इत्यादी गोष्टीची माहिती जाणून घेतली. सर्व सहभागी युवकांना खादीचे ध्वज असलेले आकर्षक सन्मान चिन्ह, सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे एकत्र दर्शन घडवून आणणारा हा राष्ट्रीय युवा महोत्सव असल्याने व या ठिकाणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी नेहरू युवा केंद्र च्या माध्यमातून मिळाल्याने नेहरू युवा केंद्र चे आणि चंद्रपुर जिल्हा युवा अधिकारी समशेर सुभेदार यांचे जिल्ह्यातील युवकांनी आभार मानले.