राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर,(दि.1जून) : – राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. याबाबत 29 मे 2024 रोजी राज्य तंबाखु नियंत्रण कक्ष, मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर यांचा सत्कार करण्यात आला.

मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांची आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी 1 मे ते 31 मे 2024 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या तसेच वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कार्याची पडताळणी करण्यात आली.

यात जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक पटकवला आहे. सदर कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येतो. मुंबई येथे सत्कार समारंभाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सावलीकर ,कौन्सिलर श्री निरांजने उपस्थित होते.