राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांच्यावर गोळीबार करून हत्या

✒️संतोष लांडे पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.7 सप्टेंबर) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळ जनक घटना नाना पेठ मध्ये रात्री उशिरा खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गणेश उत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने मध्यभागात घबराट उडाली आहे वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावरती हल्लेखोरांनी त्यांच्या पिस्तुलीतून पाच ते सहा गोळ्या झाडल्या तसेच आंदेकर जिवंत राहू नये म्हणून परत कोयत्याने वार करण्यात आला.

घटनास्थळी असलेले लोकांनी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती गुणशाखेचे निखिल पिंगळे यांनी दिली गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली नाना पेठ परिसरात आंबेकर टोळीचा दबा दबा आहे .

त्यामुळे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात गबरबात उडाली वनराज यांच्यावर निकड वरती आणि गोळीबार केला असून कौटुंबिक वाद वर्चस्वचं वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनास्थळीची माहिती मिळताच महाराष्ट्र दस्त क्राईम रिपोर्टर यांनी जाऊन पाहणी केली.