✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.2 ऑक्टोबर) : – राष्ट्रपिता नगर विकास मंच भद्रावती तर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती गांधी चौक येथे साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण केल्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करण्यात आली.
काशिनाथ मनगटे यांनी गांधी भजनाचे गायन करून त्यांच्या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रपिता नगर विकास मंच अध्यक्ष धनंजय गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, रवी पवार, सुरज गावंडे, दिलीप ठेंग ,डॉ. यशवंत घुमे, जावेद शेख, दत्तू सैतान , रत्नाकर लुथळ, भाऊराव कुटेमाट , जयदेव खाडे ,ओम प्रकाश वैद्य , मनोहर नागपुर , अंजया पुल्लपवार , सुरेश मांढरे सह आदी उपस्थित होते.