✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि .14 ऑगस्ट )रोजी तालुका कृषि अधिकारी वरोरा मार्फत आयोजित रानभाजी महोत्सव व प्रधानमंत्री कृषी अन्न प्रक्रिया उन्नयन अंतर्गत कृषि प्रक्रिया जागृती पंधरवाडा मोठ्या थाटात संपन्न झाला. महोत्सवाचे आयोजन कांचणी शेतकरी उत्पादक कंपनी च्या परिसरात करण्यात आले.
तालुक्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गट, व शेतकरी तसेच आनंद निकेतन कृषि महाविद्यालयचे विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात रानभाज्या व रानभाज्यांची व्यंजने प्रदर्शनाकरिता व विक्रीकरिता ठेवलेली होती.
वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या शुभहस्ते विर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून करून दिमाखात उद्धाटन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी सुनंदाताई जीवतोडे, माजी जि प सदस्य; सुशांत लव्हटे, तालुका कृषि अधिकारी तथा ऊपविभागीय कृषि अधिकारी वरोरा; यशवंतजी सायरे.
संचालक कांचणी शेतकरी उत्पादक कंपनी चिनोरा; भानुदासजी बोधाने, प्रगतिशील शेतकरी कोंढाळा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच अध्यक्षीय स्थानी डॉ सुहास पोतदार, प्राचार्य आनंद निकेतन कृषि महाविद्यालय वरोरा उपस्थित होते.
महोत्सवात विविध रानभाज्या व पौष्टिक भरडधान्ये तसेंच रानभाज्या व भरडधान्यांची विविध व्यंजने, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या नवउद्योजकांचे उत्पादने व तालुक्यातील पसारे फार्म चे एकमेव ड्रॅगन फ्रुट प्रदर्शनी व विक्रीकरिता उपलब्ध होते. उत्तम आरोग्याकरिता रानभाज्या व भरडधान्ये उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणातून केले.
रानभाजी महोत्सव चे महत्व व विविध रानभाज्यांचे उपयोग तसेच अन्न प्रक्रिया उद्योगात सहभागी होण्याविषयी तालुका कृषि अधिकारी सुशांत लव्हटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना संबोधित केले.
कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास पोतदार यांनी कृषि महाविद्यालयाची शेतकऱ्यांविषयी भूमिका आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट केली तसेच कांचणी शेतकरी उत्पादक कंपनीची शेतकऱ्यांविषयी भूमिका श्री यशवंतजी सायरे यांनी आपल्या भाषणातून मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय काळे मंडळ कृषि अधिकारी शेगाव यांनी व आभार प्रदर्शन किशोर डोंगरकार कृषि पर्यवेक्षक यांनी केले. महोत्सवात एकूण ४० स्टॉल लावलेले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली व रानभाज्यांची खरेदी केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कृषि विभागाचे व आत्मा चे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.