🔹नुकसान भरपाईची मागणी
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.3 ऑगस्ट) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या तसेच वरोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले कोकेवाडा तु. हे गाव जंगल लगत असून जंगलातील वन्य प्राण्यांचा मोठा हैदोस असतो या वन्य प्राण्याच्या हौदोसामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त असून येथील शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.
सविस्तर असे की गेल्या अनेक दिवसापासून मुसळधार पावसाने अनेक शेत पीक धोक्यात आली असून आज च्या स्थितीमध्ये शेतामध्ये असलेले सोयाबीन पीक मुसळधार पावसाने नाशवंत झाले तर काही सोयाबीन पीक शेतामध्ये उभे आहे परंतु अर्जुनी कोकेवाडा हे सर्व गावे जंगल लगत आहे त्यामुळे येथील सर्व शेतकरी आपल्या पिकाची संरक्षण करण्याकरिता रात्रोला जागल करून आपल्या पिकाची संरक्षण करतात परंतु काही दिवसापासून सतत धार मुसळधार पावसाने रात्र शेतामध्ये पिकाचे संरक्षण करणे कठीण असल्याने या संधीचा फायदा घेत जंगलातील वन्यप्राणी रानटी डुक्कर , हरीण यांचे कळप शेतामध्ये येऊन शेतात असलेले पीक खाऊन नष्ट करतात.
यातच कोकेवाडा तुकूम येथील युवा शेतकरी प्रतीक अभय खीरटकर यांच्या स्वमलकीच्या आठ एकर शेतामधील असलेले सोयाबीन पीकची नासाडी करून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान केले रानटी डुक्कर हरीण व अन्य वन्यप्राण्यांमुळे फार मोठे नुकसान केले . असले तरी देखील अजून पर्यंत या गावात कोणतेही शासकीय अधिकारी पंचनामे करण्या करिता आले नसल्याचे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले . तेव्हा या गंभीर समस्या कडे तात्काळ लक्ष केंद्रित करून वन विभाग चे अधिकारी तसेच संबधित अधिकारी यांनी तात्काळ या भागाची पाहणी करून पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.