राजुरा येथे युवकावर गोळीबार 

🔹गोळीबारात युवकांचा जागीच मृत्यू

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.24 जुलै) :- राजुरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र आसीफाबाद रोड येथील ओम जनरल स्टोर्स येथे स्वतःच्या जीवाचा बचाव करीत असलेल्या 28 वर्षीय युवक शिवज्योतसिंग देवल यांना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपीने गोळीबार करून हत्या केल्याची घटना आज दि.23 जुलै ला रात्रौ सातच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार मृतक शिवज्योतसिंग देवल 28 राहणार सोमानाथपुर वार्ड राजुरा हा आपल्या वडिलांना कर्नल चौक येथून भेटून आसीफाबाद रोड ने चालला असताना त्यांच्या मागावर असलेल्या दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीने पाठलाग करीत होते.

दरम्यान कसलीही माहिती नसणाऱ्या शिवज्योतसिंग देवल यांच्यावर अचानक हल्ला झाल्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ओम जनरल स्टोर्स येथील सौचल्यात घुसला परंतु आरोपीने समोरासमोर गोळ्या झाडल्या यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.