🔹वरोरा विधानसभेत मनसेचाच उमेदवार निवडून येईल याबाबत केला मोठा खुलासा
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.12 ऑगस्ट) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी विधानसभेच्या जवळपास 250 जागा लढविण्याच्या तयारीत असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी केल्यानंतर मराठवाडा विदर्भात सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात मनसेचे उमेदवार उभे राहणार आहे, त्यात चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, चंद्रपूर व वरोरा या तीन ठिकाणी उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षाकडून रनणिती आखली जातं आहे. दरम्यान जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीची आढावा बैठक नुकतीच काल दिनांक 10 आगस्ट ला वरोरा येथील द्वारकाधीश लॉन मध्ये घेण्यात आली होती.
त्या बैठकीत मनसेचे सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे प्रांताध्यक्ष संतोष नागरगोजे हे पक्षाचे निरीक्षक म्हणून मार्गदर्शन करतांना म्हणाले की या विधानसभा क्षेत्रातून मनसेचा उमेदवार निवडून येईल असे वातावरण आहे, कारण मी सतत तीन दिवस या विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य शेतकरी, कामगार, पत्रकार पोलीस व इतर सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो व त्यांना या विधानसभा क्षेत्रात मनसेचा उमेदवार दिल्यास काय स्थिती राहिलं असं विचारलं असता त्यावर मनसेच्या उमेदवाराची चांगली स्थिती राहिलं असं सांगण्यात आल्याचं त्यांनी भाषणात आवर्जून सांगितलं, त्यामुळं या क्षेत्रात मनसेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन कामाला लागा असा आदेश सुद्धा त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला.
आपल्या भाषणात संतोष नगरगोजे यांनी स्पष्ट केले की या विधानसभा क्षेत्रात गोरगरीब जनतेचे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व इतर पदाधिकारी जनता दरबाराच्या माध्यमातून सोडवीत आहे, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफिचा प्रश्न असेल की पीक विम्याचा, स्थानिक कंपन्यात मराठी भूमिपुत्रांच्या नौकऱ्यांचा प्रश्न असेल की कामगारांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष भक्कमपणे जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे, जातपात विसरून मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते लढत आहे, त्यामुळे पक्षाची भूमिका व राजसाहेब ठाकरे यांचे मराठी माणसांप्रतीचे विचार घराघरात पोहचवून मनसेचा उमेदवार निवडून आणण्याकरिता आता आपण सज्ज झालं पाहिजे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी मनसे शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष शिंदे, जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील घुडे, रमेश काळबांधे, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, तालुका अध्यक्ष विशाल देठे, राम पाचभाई, मोहित हिवरकर, वर्षा भोम्बले, वरोरा महिला सेनेच्या तालुका अध्यक्ष रेवती इंगोले व इतर पदाधिकारी आणि वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील गावखेड्यातून मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार व जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
काय आहे खुलासा?
वरोरा भद्रावती ही विधानसभा मनसेकारिता फार महत्वाची असून इथे जर पक्षश्रेष्ठीनी लक्ष घातले तर मनसेचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल अशी राजकीय परिस्थिती आहे, दरम्यान मनसेच्या वतीने गुप्त सर्व्हे करण्यात आला होता व यामध्ये विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत सर्वसामान्य जनता, पोलीस, पत्रकार, शेतकरी व कामगार यांना प्रश्न विचारून माहिती घेतली असता महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे सक्षम पर्याय म्हणून लोकं स्वीकारतील अशी माहिती पुढे आल्याचे स्वतः पक्षाचे निरीक्षक मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी आपल्या भाषणात खुलासा केला.