🔹उखर्डा ते उखर्डा पाटी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था
🔸रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी :- अभिजित कुडे, विधानसभा प्रमुख युवासेना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)
✒️ शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.29 जून) :- तालुक्यातील उखर्डा ते उखर्डा पाटी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, रस्त्यात तलाव की तलावात रस्ता हा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण रस्त्यात खड्डे पडले असून प्रवास करणे अवघड झाले आहे.
लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांचे तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या रस्त्याच्या मागणी साठी झाडे लावा आंदोलन, भजन आंदोलन करण्यात आले अनेक निवेदन देवून देखील या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आली नाही.
अनेक आंदोलन करून निवेदन देऊन निराशा पदरी पडले आहेत. लोकांमधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बांधकाम विभाग कुंभ करण झोपेत आहे. रात्रीच्या वेळी अनेक अपघात घडत आहेत. गेल्या 4 वर्षापासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. निवेदन दिले आंदोलन केले त्या नंतर तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा रस्त्याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे .
ग्रामीण भागातील लोकांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. लाजिरवाणी बाब आहे की अजून देखील प्रशासनाला गांभीर्य लक्षात घेता आले नाही. तात्काळ रस्त्याचे काम करावे अन्यथा बांधकाम विभागाला कुलूप लावून आंदोलन करणार असा इशारा युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे यांनी दिला आहे.
लोकांचा संयम संपला असून जनता त्रस्त झाली आहे हतबल झाले आहेत. रस्त्यात खड्डे पडले नसून ते तलाव झाले आहे. 3,4 फुट खोल खोल खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला.