✒️ परमानंद तिराणिक वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.8 मार्च):- तालुक्यातील उखर्डां ते नागरी रस्त्यासाठी लक्षवेधी आंदोलन कृषीप्रधान देशात ग्रामीण भागातील समस्यांकडे सरकार व प्रशासनाच्या वतीने लक्ष दिल्या जात नाही.
ग्रामीण भागातील जनतेला निवडणुका व निवडणुकीतील आश्वासने यापेक्षा जास्त काहीच सरकारच्या वतीने मिळत नाही.
वरोरा तालुक्यातील उखर्डा पाठी ते उखर्डा तसेच उखर्डा ते नागरी या संपुर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे.संपुर्ण रस्त्यावर जीवघेणे मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
नागरिकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे त्या भागातील खाजगी व सार्वजनीक प्रवासी वाहतूक पूर्णत विस्खडीत आहे. एखादा अपघात झाल्यास आपातकालीन परिस्थीतीत एखादी रुग्णवाहिका देखील येऊ शकत नाही पण याकडे ना लोकप्रतिनिधि ना सार्वजनीक बांधकाम विभाग प्रशासनाचे लक्ष आहे.
या भागातील नागरीकांनी अनेकदा त्या भागातील लोकप्रतिनिधि व प्रशासनाकडे तक्रारी केल्या पण रस्त्याची समस्या काही सुटेना…
बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन देखील खड्डे बुजविण्यात आले नाही या मुळे आम्ही खड्ड्यात बेसरमची झाडे लावून आंदोलन करण्यात आले. जर 10 दिवसात खड्डे बुजविण्यात आले , अनेकवेळा निवेदन देण्यात आली.नाही तर वरोरा येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार , या जीवघेण्या खड्डया मुळे अनेक अपघात घडत असतात .या खड्ड्यात पडून कुणाला जीवित हानी झाली तर प्रशासन जबाबदार राहणार