रब्बी हंगामातील सोयाबीन पिके बहरली

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.19 जानेवारी) :- शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिके लागवड केली त्यामध्ये धान, , तूर,कापूस पिकांची लागवड केली,परंतु हंगामात आलेल्या यलो मोझँक, रोगाने शेतकऱ्यांची सोयाबीन पीक नष्ट केली, त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके लागवड केली आहे.

पावसाळ्या दिवसांमध्ये खरीप हंगामाला सुरुवात होते त्यामध्ये शेतकरी धान,सोयाबीन,कपास, पिके जास्त प्रमाणात घेत असून रब्बी हंगामातील सुद्धा मोठ्या प्रमाणात घेत असतात शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड झालेली दिसून येत आहे,तसेच चना ,मूग डाळ, सोयाबीन, हळद, उडीद,लाकोरी, लागवड केली असून या पिकांना पाण्याची प्रमाण कमी लागते यामध्ये सोयाबीन पिके विशेष करून कमी शेतकऱ्यांनी घेतली असून पिके सगळीकडे हिरवीगार परिसर पाहायला मिळतो.

शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे साधन असून यामध्ये चारगाव धरण,निमडला तलाव, ईरर नाला,चंदई नाला भेंचोद्वारे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध असून मोटार पंप, विहिरीचा साधन आहे.

खरीप हंगामात झालेली नुकसान रब्बी हंगामामध्ये थोडंफार भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून होत असून निसर्गाच्या लहरीपणाचा दगा पुन्हा शेतकरी कापणीच्या वेळी याकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या लक्ष लागलेली आहे..