रद्द झालेला विकास परवाना सनद व सातबारा पूर्ववत न. प. समोर पती-पत्नीचे उपोषण ठिकाणी श्री पंडितराव देशमुख यांची भेट

✒️सारंग महाजन (बुलढाणा प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.26 जून) :- चिखली शहरातील शेत सर्वे नंबर 120 / 2 मधील सौ .अर्चना सतीश खबुतरे यांच्याकडून घेतलेल्या भूखंडाचा रद्द झालेला विकास प्रवाना सनद आणि सातबारा पूर्ववत होण्यासाठी सुनील रामआप्पा देशमाने व सौ प्रतिभा सुनील देशमाने हे पती-पत्नी 24 जून पासून स्थानिक नगर पालिकेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. यांच्यासह 29 प्लॉट धारक या प्रकारामुळे त्रस्त झाले असताना प्रशासन मात्र चालढकलपणा करत असल्याचे दिसून येत आहे.

      शेत सर्वे नंबर 120 / 2 सौ अर्चना सतीश खबुतरे यांनी 81 आर जमिनीवर लेआउट टाकला लेआउट हा चिखली जाफराबाद रोडवर प्राईम लोकेशन मध्ये असल्याने शहरातील 29 जणांनी येथे प्लॉट खरेदी केले यामध्ये सुनील रामआप्पा देशमाने, सौ प्रतिभा सुनील देशमाने ,स्वाती सतीश देशमाने ,पुष्पा शाम राऊत, शाम राऊत ,डॉ. गौरव दिलीप महिंद्रे ,डॉ.गोपाल सखाराम लोखंडे ,प्रमोद मदन नवले, अनिल गंगाधर अंबुर्णे ,रघुनाथ विश्वनाथ पवळ ,प्रदीप पुंडलिक पालवे ,स्वाती प्रदीप पालवे ,श्रीमती मनीषा बोंद्रे, गणेश दस्तगीर गिरी, सौ ज्योती संदीप वायाळ, निशा सागर दांडेकर, रमेश नारायण सावळे ,सौ वैशाली पंजाबराव देशमुख ,गजानन सुरडकर, शिवकन्या हनुमान शेळके, सागर मदनलाल दंडेकर, संतोष दिगंबर सपकाळ ,संदीप बंडू वायाळ, रमेशगिरी सोनवारगिरी गिरी, आधी जणांनी विकत घेतलेल्या प्लॉटच्या कागदपत्रावर सरकारी अधिकाऱ्यांची सही ,शिक्के त्यानंतर नगरपालिकेकडून बांधकाम परवानगी घेऊन अनेकांनी तिथे घरे बांधली आहे. शहरातील क्रीम एरिया असल्याने विविध बँकांनी या प्लॉटवर लाखो रुपये कर्ज सुद्धा दिले आहे. मात्र निलेश श्रीकृष्ण जाधव यांच्या तक्रारीवरून या लेआउट मध्ये माझी नऊ गुंठे जमीन सौ अर्चना खबुतरे यांनी हडपल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे .

या उपोषणाच्या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते , यांनी भेट दिली असून श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री पंडितराव (दादा )देशमुख माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे अमरावती विभाग संघटक सारंग महाजन यांनी सुद्धा उपोषण ठिकाणी भेट दिली.