रत्नमाला चौकात युवकांचा युवा सेनेत पक्षप्रवेश

🔸प्रणय पारलेवार व ऋतिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली वरोरा तालुक्यातील युवकांचा शिंदे गटात प्रवेश

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.20 जानेवारी) :- वरोरा तालुक्यातील युवकांचा युवा सेना (शिंदे गट) पक्षप्रवेश सोहळा उद्या, दुपारी 1 वाजता रत्नमाला चौक, वरोरा येथे आयोजित करण्यात आला आहे.  

प्रणय पारलेवार व रितिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक युवक युवा सेनेत सामील होणार आहेत. या कार्यक्रमाला युवा सेना सचिव शुभम नवले, महाराष्ट्र कार्यकारी सदस्य व निरीक्षक (पूर्व विदर्भ) हर्षल शिंदे, जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर आणि जिल्हा समन्वयक प्रमोद नागोसे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  

कार्यक्रमाचे आयोजन,पक्षप्रवेशाद्वारे तालुक्यातील युवकांना सक्रिय राजकीय सहभागाची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाबद्दल युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.