रक्तदान करून वाचविले रुग्ण महिलेचे प्राण

🔹रुग्णांनी तसेच त्यांच्या पालकांनी मानले आभार

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.20 ऑगस्ट) :- वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अभिजीत पावडे हे गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्याचे व्रत हाती घेऊन सामाजिक क्षेत्रात काही ना काही उपक्रम तसेच पीडित जनतेला सहकार्य करणे तसेच रुग्णांच्या सेवेत वेळोवेळी धावत जाणे व अशा अन्य कार्यामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा असतो .

अभिजीत पावडे हे एका गाव खेड्यातील असून ते कमी वयात राजकारणामध्ये पाय रोऊन आदिवासी कार्यकारणी सोसायटी चारगाव बूज . येथे त्यांनी आपल्या पहिल्या यशाचा झेंडा फडकवून उपसभापती पदाचा कारभार हाती घेतला यासोबत अन्य राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ते समाजकारणातून राजकारणातून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न ते करीत आहे .

त्यामुळे ते रुग्णसेवेत अधिक भर देत रुग्णांच्या सेवेत सदैव तत्पर असतात यातच अभिजीत पावडे हे त्यांचे मित्रा सह चंद्रपूर येथे खाजगी कामासाठी आले असता. इतक्यातच त्यांना अंकुर हॉस्पिटल चंद्रपूर येथून फोन आला एका महिलेला रक्ताची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी हातचे काम अलग सारून तात्काळ रुग्णालयात धाव घेतली व तिथली परिस्थिती पाहून सौ रुचिता नितेश कातकर या रुग्ण महिलेला रक्ताची अत्यंत गरज असल्याचे समजले तेव्हा कसल्याही प्रकारची तमा न बाळगता ब्लड रक्त देण्यास सुरुवात केले त्याच सोबत त्यांचे असलेले मित्र व्यंकटेश जगापल्ली, सुशांत धोकरे यांनी देखील महिलेला रक्तदान केले . व अखेर रुग्ण महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली तेव्हा त्यांच्या नातलगांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी या तिघांचे मनापासून कौतुक करून आभार मानले. त्या दुःखी कुटुंबीयांना धीर देत.

 अभिजीत पावडे व त्यांच्या मित्रांनी त्यांना पुढील काही मदत लागल्यास आम्हाला सांगा आम्ही सदैव तुमच्या मदतीस धावत येऊ असे सांगितले त्या कुटुंबाला दुःखातून सावरण्यास धीर दिला त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा.