येत्या २० ऑगस्टला चंद्रपुरात गनिमी कावा आंदोलन करण्याचा इशारा रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे चिमूर तालुका प्रमुख युवा नेते अशिद मेश्राम 

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)

चिमूर(दि.9 ऑगस्ट) :- गेल्या चार वर्षांपासून चिमूर तालुक्यातील काग येथील पांदण रस्त्यांसाठी (गावकऱ्यांची )सातत्याने मागणी होत असतांना स्थानिक प्रशासनासोबतच जिल्हा प्रशासन या कडे दुर्लक्ष करतेय आहेत .

या मागणीची पूर्तता १९ऑगस्टपर्यंत झाली नाही तर येत्या २०ऑगस्टला चंद्रपूरात गणिमी कावा आंदोलन करण्याचा निर्धार रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे चिमूर तालूका प्रमुख युवा व तडफदार नेते अशिद मेश्राम यांनी केला आहे. 

सदरहु आंदोलन आपण रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान या बाबतीत नुकतेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या कडे एक लेखी निवेदन सादर केले असल्याचे मेश्राम यांनी आज बोलतांना सांगितले .