▫️पत्रकारावर अन्याय झाल्यास नक्कीच न्याय मिळवून देऊ संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार(Founder President Ganesh Kachkalwar will surely bring justice if injustice is done to the journalist)
✒️ गजानन लांडगे महागाव(Yavatmal प्रतिनीधी)
महागाव (दि.3 सप्टेंबर) :- तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र भर युवा ग्रामिण पत्रकार संघटना सध्या जोर धरत आहे . कारण पत्रकारावर वारंमवार होणारे भ्याड हल्ले, राजकीय दबाव, ठेकेदारीच्या नावावर काम करणारे प्रशासनाचे दलाल, लाच घेऊन दसरा दिवाळी साजरी करणारे भ्रष्ट अधिकारी यांचा बोलबाल्याचा डंका सध्या संपूर्ण राज्यभर सुरु आहे.
त्यामुळे जागातिल चौथ्या आधारस्तंभाचे निस्वार्थी व निर्भीड पत्रकार अनेक कंत्राटी कामामध्ये अनियमिता व अपरातफर करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध वास्तव्य स्थिती बातमीच्या माध्यमातून प्रकाशित करून जनतेसमोर निर्भीडपणे उघड करतो तेव्हा त्या पत्रकाराला राजकीय दबाव येतो तसेच खोट्या गुन्ह्यात अटकवले जाते. त्या हीपेक्षा क्रूर प्ररवृत्ती पत्रकाराचा आवाज कायमचा बंद करण्यासाठी कित्येक पत्रकाराची निर्गुण हत्या केली जाते. त्यामुळे पत्रकाराचे परिवार देशोधडीला लागतात.
एकाच थालीचे चट्टे बट्टे असल्यामुळे प्रशासकीय भ्रष्ट अधिकारी सुद्धा आपली डोकेदुखी संपली म्हणून आपल्या नेहमीच्या आनंदात मग्न होऊन विशेष सेलिब्रिटी पार्टीचा आस्वाद घेतात. म्हणून एकच ध्येय उराशी बाळगून युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारावर होणारे अन्याय अत्याचार विरुद्ध संघटित होऊन लढा देण्यासाठी व पत्रकारांना न्याय मिळवून देण्याकरिता युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी हि संघटना स्थापन केली आहे. म्हणून रविवारी (ता.०३) रोजी महागांव येथील शासकीय विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघटना गठीत केली आहे.
संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते महागांव तालुका अध्यक्ष पदी संतोष जाधव, महागांव तालुका कार्याध्यक्ष पदी मनोज सुरोशे, महागांव तालुका उपअध्यक्ष पदी शेख तस्लिम शेख आयुब, महागांव तालुका उपअध्यक्ष पदी सुनिल चव्हाण, शहर अध्यक्ष पदी श्रीकांत राऊत, तालुका सचिव पदी हरीभाउ खंदारे, तालुका सह सचिव पदी शेख शब्बीर तर, यवतमाळ जिल्हाध्यक्ष युवा आघाडी पदी म्हणुन प्रतिक पाटील नरवाडे यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी युवा ग्रामिण पञकार संघाचे सदस्य पञकार सदानंद जाधव, एस के शब्बिर, शेरखान पठाण, मनोज सुरोशे, श्रीकांत राऊत, हरीभाऊ खंदारे, रविराज कावळे तसेच प्रतिक नरवाडे, गणेश नामदेव राठोड, बबन बलदेव जाधव कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा ग्रामिण पञकार संघाचे राष्ट्रिय सदस्य रजतकुमार खाडे यांनी केले.