युवतीने गळफास घेऊन संपवली आपली जीवन यात्रा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू(दि.18 जुलै) :- 

स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या वायगाव खडतकर येथे आज दुपारी एका युतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर असे की येथील युवती कुमारी करिष्मा प्रभाकर मन्ने वय वर्ष 20 वर्ष राहणार वायगाव खं. येथील रहिवासी असून ती इयत्ता बीए प्रथम वर्ष शिक्षण घेत होती परंतु वारंवार घरच्या किटकिट व आई च्या मनस्तापामुळे या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली .

विशेष म्हणजे मुलगी ही कॉलेज विद्यार्थिनी असल्यामुळे वारंवार मित्र तसेच मैत्रिणी यांचे फोन कॉल येत होते यावरती बोलत असता तिची आई तिला वाटेल त्या शब्दात बोलून तिचा अपमान करत होती या अपमानाल कंटाळून तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज गावकरी तसेच पोलीस अधिकारी यांनी अंदाज वर्तवला. तसेच आज देखील सकाळच्या सुमारास आईसोबत तिचे शब्दांकन भांडण झाले होते आई तसेच वडील शेतामध्ये बाहेर गेली असता दुपारचा सुमारास तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे गावात तसेच परिसरामध्ये दुःख हळहळ व्यक्त केले जात आहे.

याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव बुद्रुक ते ठाणेदार श्री योगेंद्रसिंग यादव यांना मिळतात यांनी आपल्या ताब्यासह आपली जमू घटनास्थळी दाखल केले व मृतदेह ताब्यात घेऊन अधिक पंचनामा करून मृतदेह उत्तरनिय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय वारोरा येथे हलविण्यात आले. या घटनेचे अधिक माहिती तसेच तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात येतील पीएसआय श्री महादेव सुरजूसे हे करित आहे.