यवतमाळ जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेऊन धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या वाढदिवस साजरा

✒️यवतमाळ(Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि.6 सप्टेंबर) :- रोजी धर्मनेता भगवंतसेवक आदरणीय किसनभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातील विविध ठिकाणी राज्य संघटक किसनभाऊ जाधव व यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळुभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला कुठे कुठे भव्य आरोग्य शिबिराचे कार्यक्रम तर कुठे वृक्षारोपणाचा कार्यक्रम तर कुठे रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.

आमणी खुर्द महागाव तालुका येथे पुसद येथील नामांकित आयकॉन हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर साहेब उपस्थित होते व शासकीय रुग्णालय सवना शासकीय रुग्णालय येथे भव्य स्वरूपात फळ वाटपाचं व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी उपस्थिती राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे बुलंद आवाज जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रवीण जाधव सर जिल्हा संघटक दिनेश जाधव जिल्हा उपाध्यक्ष अतुल राठोड राहुल चव्हाण गोपाल चव्हाण तालुका अध्यक्ष सुनील राठोड मोहन राठोड़ प्रकाश चव्हाण सुरज चव्हाण स्वप्निल राठोड विशाल जाधव,बालासाहेब तुकाराम भावले, सुरज चव्हाण,सुनील चव्हाण ,विक्रम चव्हाण, आकाश आडे ,ईश्वर देवगणहो व सर्व राष्ट्रीय बंजारा परिषद यवतमाळ जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते