✒️सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)
पुणे (दि.12 मे ) :- सौ .सुशीलाबेन मोतीलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट ,पुणे तर्फे मोतीलाल शहा यांचे वाढदिवसानिमित्त नुकतेच दि.७ मे २०२३ रोजी दुपारी १वाजता वाई येथील सोमजाईनगर ,मातंग वस्तीतील गरीब गरजू ८८ महिलांना साडी मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि राष्ट्रीय विकास महासंघाच्या सातारा कार्याध्यक्ष प्रा.भाग्यश्री काळभोर ,रेखा शहा ,रिचा शहा आणि आयोजक मनोज शहा उपस्थीत होते.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की दरवर्षी जेष्ठ समाजसेवक मोतीलाल वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असतात. वर्षभरात अपंग व्यक्तींना व्हिलचेअर,तीनचाकी सायकल ,अनाथ आश्रम , गोशाळा,अशा विवध ठिकाणी मदत करीत असतात.
या वयात ही दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी जनकल्याण रक्तपेढी मद्ये रक्तदान शिबिर,तसेच जयपूर पुट,हात गरजूना बसवून देतात. त्यांचे आज वय ८८ आणि पत्नी चे ८७ वय असताना देखील ते सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून मदत करीत आहेत. अशा दानशूर व्यक्ती आहेत म्हणून महाराष्ट्रात सामाजिक समतोल राखला जात आहे.
त्यांचा आदर्श इतर व्यक्तींनी घेतला आणि विविध घरगुती कार्यक्रमात नाहक आर्थिक उधळपट्टी न करिता गरजूंना मदत केली तर नक्कीच आत्मिक समाधान लाभेल असे देखील ढोक म्हणाले. तसेच आज काही महिलांनी शिलाई मशीन देखील मिळाली तर आमच्या मुली स्वबळावर काम करतील तर लगेच आयोजक मनोज शहा लवकरच शिलाई मशीन देतो म्हणालेत त्याबद्दल त्यांचे संस्थेचे वतीने अभिनदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्रा.भाग्यश्री काळभोर करताना म्हणाल्या की शहा कुटुंबाने गेल्या वर्षी पण याच ठिकाणी साडी वाटप केले आणि यदाही त्याबद्दल त्यांनी परिवाराचे आभार मानले.
तर मोलाची मदत रुपाली आणि शीला वायदंड ,विकास तुपे आणि दक्ष , रिया शहा यांनी केली