✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.22 मे) :-
जिल्ह्यातील आम आदमी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात मुल तालुक्यातील अनेक प्रमुख शेतकऱ्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिपक बरशेट्टीवार, परामजित सिंह झगडे आणि मुल तालुक्याचे कवडूजी येंनप्रेडिवार यांनी केले. जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर आणि जिल्हा संगठन मंत्री शंकर सरदार अरोरा प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात खालील शेतकऱ्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला: महादेव मुहूर्ले,वासुदेव कन्नाके,हिवकर कन्नाके,यशवंतराव जेगठे, विश्वास चीताडे, पांडुरंग सिदाम, यशोदाबाई शेंडे, प्रवीण गोहने, प्रकाश खोब्रागडे, नितेश येनप्रेडीवार, ईश्वर निखाते, निमेश कुडे, प्रकाश खोब्रागडे इत्यादी नी केला.
आम आदमी पक्षाने जिल्ह्यातील आपली संघटनात्मक उभारणी अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले असून येत्या विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह आणि चैतन्य दिसून येत आहे.
आम आदमी पार्टीने शेतकरी हिताचा आवाज उठवत आपली पकड जिल्ह्यात मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. येत्या काळात अशा प्रकारची चळवळ जिल्ह्याच्या विविध भागात होऊन जनतेला एक नवा पर्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या आकांक्षा आणि आशा प्रतिबिंबित करणारा हा एक महत्त्वाचा पवित्रा ठरू शकतो.