✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.16 एप्रिल) :- १९ एप्रिल ला लोकसभेची निवडणुक आहे. या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे उमेदवार आहेत. नाम. मुनगंटीवार यांनी राज्याच्या वनमंत्रालयासोबत सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचा पदभार सांभाळल्यानंतर अनेक धाडसी व महत्वपुर्ण निर्णय घेतले, त्याचा यानिमीत्ताने घेतलेला आढावा.
वन मंत्रालयाचा लोकाभिमुख निर्णयाचा धडाका
वन मंत्रालय ! पुर्वी एखादा राजकीय पुढारी नाराज झाला तर त्याला वन मंत्रालय देऊन खुश करण्याची प्रथा होती. लाल दिव्याच्या गाडीत मंत्री म्हणुन मिरविता येते, या भावनेतुन तो मंत्री ही खुश व्हायचा. वनमंत्रालयामध्ये काही धडाकेबाज, लोकाभिमुख करून चर्चेत राहण्यासारखे काही नाही, अशी धारणा होती.
‘मिळेल त्याचे सोने’ करण्याच्या मुनगंटीवार यांच्या अभ्यासवृत्तीमुळे त्यांचेकडे ही वित्त-नियोजन या महत्वाच्या खात्यासोबत बहुतेक काहीही धडाकेबाज न करता येणारे किंवा भाऊंवर कामाचा जास्त बोजा नको म्हणुन वनमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असावी. मुनगंटीवार वनमंत्री बनता क्षणी त्यांची धडाकेबाज लोकाभिमुख निर्णय घेत महाराष्ट्र वनमंत्रालयाला देशामध्ये विशेष स्थान मिळवून दिले. अभ्यास असला तर कोणतेही पद महत्वाचे असते, ही धारणा वनमंत्री झाल्यानंतर सुधीरभाऊंनी रूढ केली असेच म्हणावे लागेल. वन विकासासतुन जनविकास या धोरणातुन मुनगंटीवारांच्या नेतृत्वात वनविभागाने लोकाभिमुख धडक निर्णय घेतले. वनालगतच्या गावांच्या सर्वांगिण विकासाकरीता ११२ गावांमध्ये शामाप्रसाद मुखर्जी जन-जन योजनेची अंमलबजावणी हा त्यामधीलचं एक निर्णय म्हणावा लागेल.
या योजनेसाठी विकास निधी म्हणुन प्रत्येक गावास २५ लक्ष प्रति गाव असा निधी उपलब्ध करून दिला तसेच हरित महाराष्ट्राच्या निर्मीतीकरिता ५० कोटी वृक्ष लागवड अभियनाची अंमलबजावणीचा निर्णय तर ऐतिहासिक ठरला. राष्ट्रीय प्राणी वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे हे नजरेत येताच वाघांच्या संवर्धनासाठी विशेष मोहिम राबविली व जगभरात या मोहिमेचा प्रसार करण्यात आला त्यामुळे वन्यजीव प्रेमी व पर्यटकांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आज राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०१० मध्ये १६८ असलेल्या वाघांची संख्या सन २०२१ पर्यंत ३९६ इतकी झाली होती. यामध्ये एकट्या चंद्रपूर-गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यात १०० च्या वर वाघांची संख्या झाली आहे.
वाघांना बघण्याच्या उत्सुकतेपोटी महानायक अमिताभ बच्चन यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येवून वाघांचे दर्शन घेतले. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्याघ्र दर्शनाचा मोह यामुळे व्याघ्र प्रेमींना उतावळा करणारा राहिला. वाघांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे मानव वन्यजीव संघर्षांमध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जंगल भागात राहणाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे बघता मानव वन्यजीव संघर्षाचे पिडीतांना आर्थिक दिलाश्याची तरतुद करून दिली. यामध्ये मृत झालेल्या व्यक्तीस २० लक्ष तर कायम अपंग आलेल्या व्यक्तीस ५ लक्ष रूपयांचा निधींची संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक आर्थिक दिलाशाची तरतुद करून देण्यात आली .
तसेच कर्तव्य बजावतांना मृत्यु पावलेल्या वन कर्मचाऱ्यांना २५ लक्ष सानुग्रह अनुदान व अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरीची तरतुद करून देण्यास वनमंत्री मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. समुद्रतटीय क्षेत्राची भक्कम सुरक्षा करणाऱ्या कांदळवन क्षेत्रात देशात सर्वाधिक ९८ चौ. मि. ची वाढ, राज्यातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातुन ६६ गावांचे यशस्वी ऐच्छिक पुनर्वसन करण्यात आले. वन व वन्यजीव पर्यटनास चालना मिळावी यासाठी आलेल्या भरघोस प्रयत्नामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र वनविभागाला लौकीक मिळाला.
मानव-वन्यजीव संघर्षात सर्वाधिक आर्थिक दिलाश्याची तरतुद
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीस २० लक्ष तर कायम अपंग आलेल्या व्यक्तीस ५ लक्ष रूपयांचे आर्थिक सहयोग, गंभीररित्या जखमी झाल्यास १.२५ लक्ष, किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी रु. २० हजारांची मदत त्वरित उपलब्ध करून देण्यात येते तशी तरतुद वनमंत्रालयाने केली आहे.
तसेच हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यु झालस बाजार किंमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजारांची आर्थिक मदत, मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास बाजारभावन किंमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजारांची आर्थिक मदत तसेच गाय बैल, मेंढी, करी व इतर पशुधन जखमी झाल्यास औषधोपचारासाठी ५ हजार पर्यंत आर्थिक तरतुदी इत्यादी उपाययोजना करण्याची पाऊल वनमंत्रालयाने उचलले आहे. यासोबत ही आर्थिक मदत त्वरित प्राप्त व्हावी यासाठी वन मंत्रालयाने ‘हॅलो फॉरेस्ट’ नावाने २४ तास उपलब्ध असलेली १९२६ सेवा सुरू केली. वन्यप्राण्यांमुळे शेती नुकसान, भरपाईवर शासन गंभीर !
वन्यप्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान याकरिता नुकसान भरपाई अदा करणे विधेयक मंजूर करण्यात आले असुन विधानपरिषदेत ते मांडण्यात आले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास, गंभीर जखमी झाल्यास त्याला नुकसान भरपाई ची रक्कम वाढविण्यात आली आहे. उशिर झाल्यास दिले जाईल व्याज !
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील संबंधितांना देण्यात येणारी नुकसान भरपाई ३० दिवसांच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले असुन शिर झाल्यास त्यावर व्याज देण्यात येणार असल्याची तरतुद ही वनमंत्रालयाने केली आहे. याशिवाय वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशु मृत्युमुखी पडल्यास त्यात ही नुकसान भरपाईची रक्कम वाढविण्यात आलेली आहे.
वृक्षाचे करा संवर्धन !
धरतीचे होईल नंदनवन !!
झाडे लावा, झाडे जगवा इत्यादी आवाहनासोबतचं वृक्षाचे करा संवर्धन ! धरतीचे होईलनंदनवन !! यासारखे स्लोगन च्या माध्यमातुन झाडे जगविण्याचा व त्यांचे संवर्धन करण्याचे महत्व आज वनविभागांकडून नागरिकांना पटवुन देण्यात येत आहे. कोरोना काळानंतर मनुष्याच्या आयुष्यात वृक्षाचे महत्व किती ? ही कल्पना मोठ्या प्रमाणात दृढ झाली आहे.
वृक्षांच्या जगण्याने ऑक्सीजन ची होणारी निर्मीती यामुळे जंगल वाचले तर माणुस वाचेल या संकल्पनेला सामान्यांच्या मनात रूजविण्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन वन मंत्रालयाच्या पुढाकाराने वन विभाग आज आघाडीवर आहे. वनमंत्रालयाने नवसंजीवन देत वनमंत्री मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र वनविभागाला आज देशात अग्रस्थानी नेऊन ठेवले आहे.