🔹पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज…जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार
✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा(Chandrapur प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.4 ऑक्टोबर) :- महाराष्ट्र सरकारने लोकसभा निवडणुकी नंतर राज्यातील महिलांसाठी [आई व मुलगी] मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना सुखद बातमी दिली. त्यानंतर महिलांनी कागदपत्रे संकलित करून शासनाच्या सूचनेप्रमाणे अर्ज दाखल केले. सरकारकडूनही त्वरित प्रतिसाद देत अर्ज मंजूर करून ठरल्याप्रमाणे जुलै ऑगस्ट महिन्याची रक्कम महिलांच्या सेविंग खात्यामध्ये वळती केली.
पण त्यातील अनेक महिलांनी दिलेल्या बँक अकॉउंट ला जमा न करता त्यांच्या व्यव्हार बंद असलेल्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केल्यानंतर या योजनेबद्दल महिला भगिनींनमध्ये असंतोष निर्माण झालेला असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिक माहिती घेतली असता बँक कर्मचा-यां कडून असे सांगितल्या जाते की, तुमचे खात्यात बॅलन्स नसल्यामुळे आता पर्यंत मेंटेनन्स किंवा इतर कोणतेही चार्जेस कापल्या जात नव्हते. परंतु बॅलन्स हा शासनाच्या लाडक्या बहीण योजनेचे असो की कुठलेही असो ते कापल्या जाईलच असे ठामपने सांगितले गेले असल्याचे माहितीअंती कळले आहे.
त्यामुळे शासनाकडून ज्या ज्या लाडक्या बहीनींचे पैसे येऊनही ते न मिळाल्याने महिला वर्ग खूपच अडचणीत आलेला आहे. तेव्हा बँकां संबंधित या गंभीर प्रकरणाबाबत शासनातील वरिष्ठ मंत्री असलेले जिल्हा पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेऊन ज्या महिलांचे पैसे बँके कडून सरळ सरळ कापल्या गेले ती परत मिळवून देण्याची मागणी महिला वर्गाकडून करण्यात येत असल्याचे समजते.