✒️संतोष लांडे(Pune पुणे प्रतिनिधी)
पुणे(दि.2 ऑगस्ट) :- मुंबई गुन्हे शाखा कक्ष सहा मुंबई यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की एक इसम हा त्याचे साथीदारांच्या मदतीने चोरीचे मोबाईल खरेदी करून त्याचा आय एम इ आय क्रमांक बदलून त्याची विक्री करतो अशी माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आठवड्यापासून सातत्याने गोपनीय माहिती गोळा करून आरोपी इसम व त्याचे साथीदार हे मोबाईल खरेदी करून त्यांची साठवणूक कोठे करतात नमूद मोबाईलची विल्हेवाट कशी व कशी करतात तसेच इतरही गोपनीय माहिती संकलित करण्यात आली .
व ठोस माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कक्षा सहा मधील पोलीस पथकाने शिवाजीनगर मुंबई या ठिकाणी मुख्य आरोपीच्या राहत्या घरात आणि मोबाईल दुरुस्ती व विक्रीच्या एकूण तीन दुकानात विविध पथकांची मदतीने अत्यंत नियोजनपूर्वक छापा टाकून विविध नामांकित कंपन्यांचे १६२ स्मार्टफोन एक लॅपटॉप अशी एकूण १५ लाख ८८ हजार ८०० रुपये किमतीची मालमत्ता पंचनामांतर्गत हस्तगत केली त्यामुळे सर्व स्तरातून मुंबई पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.