मा.श्री. संजय वाघ ( सर ) यांचा अभिष्टचिंतन सोहळा

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.25 ऑगस्ट) :- राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिंक अन् ग्रामस्थांतून शुभेच्छांचा वर्षाव,ऐतिहासिक आणि शूरवीरांच्या सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप चवण ऋषी नाथ साहेबांच्या पावन झालेल्या भूमीतील सुपुत्र आणि आमचे सहकारी मार्गदर्शक, सामाजिक, राजकीय व धार्मिंक कार्यात मोलाची मदत करणारे, आपल्या कर्तृत्वातुन आज अनेक शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणारे मितभाषी व्यक्तिमत्त्व मा. संजय काका वाघ सरांना वाढदिवसांच्या हार्दिंक हार्दिंक शुभेच्छा … शुभेच्छुक समस्त पुरीगोसावी परिवार आणि रोखठोक सातारा जिल्हा परिवार … उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातील संजय वाघ सर यांच्या बद्दल वृत्तांत मांडायचं झालं, तर शब्दरचना कमीच आहे, असं या वाघ कुटुंबाचे धार्मिक राजकीय सामाजिक आणि विविध उपक्रमांमध्ये या कुटुंबाचा मोठा सिंहाचा वाटा आहे तसेच संपूर्ण कुटुंबांचे नेतृत्व अतिशय सर्वांनाच प्रेरणादायी आणि आदर्श ठरणारे आहे.

गावातील आणि परिसरांतील गोर गोरगरिबांच्या नव्हे, तर संपूर्ण करंजखोप नगरीतमध्ये या वाघ कुटुंबांचा चांगलाच परिचय आहे, गावामध्ये विविध धार्मिंक तसेच अनेक उपक्रमामध्ये संजय वाघ सर आणि त्यांच्या कुटुंबाचे नेहमीच सहकार्याचे मोठे योगदान आहे, सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातील आणि कुटुंबाला खाकी वर्दींतील वारसा लाभलेले हे वाघ कुटुंब आहे, आज सकाळपासूनच आदरणीय संजय वाघ सरांना कोणी समक्ष तर कोणी सोशल मीडियाच्या माध्यमांतून आज असणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्यांच्या अनुषंगाने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळपासूनच करंजखोप ग्रामस्थांसह सर्व सहकारी बांधव,मित्रपरिवार नातेवाईक अतिष्ठे परिवार यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिंक आणि विविध संस्थातून शुभेच्छांचा वर्षाव पहायला मिळत आहे, सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आदरणीय संजय वाघ सरांनी सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत.