माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य मेळाव्यात सारंग महाजन यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले 

✒️पुणे(Pune विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.17 ऑगस्ट) :- 

जालना दिनांक ११ ऑगस्ट रोजी झालेल्या मेळाव्यामध्ये अमरावती विभागीय संघटक श्री सारंग महाजन यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .

संस्थापक अध्यक्ष श्री महेश सारणीकर सर राज्य सचिव विनोदजी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष सखाराम पंथ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्रातून ३२९ पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पत्रकार संतोष लांडे पुणे यांनी श्री सारंग महाजन यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.