✒️संतोष लांडे पुणे(Pune प्रतिनिधि)
पुणे(दि.16 ऑगस्ट) :-
दिनांक ११ ऑगस्ट रोजी हॉटेल सागर इन जालना येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा महारष्ट्र राज्य महामेळावा संपन्न झाला येथे राज्यातील सर्व जिल्ह्यातून समितीचे पदाधिकारी व सभासद व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झाले होते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन माजी राज्यमंत्री श्री खोतकर साहेब व माजी नगराध्यक्ष आंबेडकर साहेब यांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला मुंबई ठाणे पुणे सोलापूर नागपूर गडचिरोली बुलढाणा हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर नांदेड धुळे परभणी, लातूर उस्मानाबाद बीड आणि जालना अशा २४ जिल्ह्यातील महिला व पुरुष मिळून साधारणता ३२९ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते.
समितीचे राज्य कार्यकारणी अध्यक्ष श्री महेश जी सारणीकर उपाध्यक्ष श्री शंकरराव सालोडकर राज्य कार्याध्यक्ष श्री सखारामजी कुलकर्णी राज्य सचिव विनोद गायकवाड यांच्या उपस्थितीत अध्यक्ष श्री मनोज महेशची सारणीकर व सचिव विनोदजी गायकवाड यांच्या हस्ते सौ ज्योत्सनाताई करवाडे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला हा सन्मान त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना देण्यात आला.