माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा तिसरा वर्धापन दिन महामेळाव्यात जालना येथे संपन्न 

🔹संघटनात्मक कार्यातून विकास हाच समाज विकासाचा मूळ पाया : श्री महेश सारणीकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष 

✒️ संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.13 ऑगस्ट) :- 

दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी हॉटेल सागर इन जालना येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा महाराष्ट्र राज्याचा राज्यव्यापी मेळावा थाटात संपन्न झाला. राज्यातील सर्व जिल्ह्यातून समितीचे पदाधिकारी असलेले राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणीतील पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते.

 माजी राज्यमंत्री श्री अर्जुनरावजी खोतकर, माजी नगराध्यक्ष श्री भास्कररावजी आंबेकर यांच्या शुभहस्ते मेळाव्याचा शुभारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री श्री अर्जुनरावजी खोतकर यांनी मार्गदर्शन केले त्याबरोबरच पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या हक्काविषयी असलेल्या मागण्या मांडण्यात आल्यास त्या जशास तश्या शासनाकडे मांडण्याचे आश्वासन देखील दिले.

 सर्व महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, छ. संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, आणि जालना अश्या एकूण २४ जिल्ह्यातील साधारण ३२९ पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात उपस्थिती नोंदवली.

 महाराष्ट्र राज्य मेळाव्यात समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री महेश सारणीकर यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची स्थापना, संकल्पना, जडणघडण, ध्येय धोरण आणि स्थापनेपासून आजपर्यंतचा विकास याची माहिती दिली, त्याबरोबर माहिती अधिकार, पत्रकारिता आणि संघटनात्मक कार्यातून सामाजिक अन्यायाला वाचा फोडणे, प्रत्येक पदाधिकाऱ्याने समाजाभिमुख कार्याचा दृष्टीकोन ठेवून जास्तीतजास्त संघटन वाढीसाठी प्रयत्न करणे यासंदर्भात आपले मार्गदर्शन केले. समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री विनोद गायकवाड यांनी पत्रकारिता विषयावर मार्गदर्शन केले, समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष श्री दीपराज इलमकार यांनी माहिती अधिकार, त्याची कार्यपद्धती, मांडणी, अर्ज करण्यापासून अपिलापर्यंत सर्व विषयावर मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पर्याय काय असतात याची देखील माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जगन्नाथ रासवे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा आणि दृष्टीकोन याचा कार्यभार समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सखारामपंत कुलकर्णी व समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री शंकर सालोडकर यांनी सांभाळला. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन समितीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष श्री काशिनाथ भालेराव यांनी सांभाळले त्याबरोबरच सर्व उपस्थितांचे आभार मानले.

विशेषतः दैनिक युवक आधार चे संपादक श्री संतोषजी आमले आपल्या सहकाऱ्यांसह कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी समितीच्या कार्याचा गौरव केला आणि लवकरच समितीसोबत आपल्या पत्रकार सहकार्यांसह जोडून घेण्याचा मानस व्यक्त केला.

 समितीतील संघटनात्मक आणि सामाजिक जाणीवेच्या कार्याचा सन्मान आणि व्यक्तिगत क्षमतेनुसार जिम्मेदारीतील वाढ यादृष्टीने श्री सचिनजी शेवाळे यांची उत्तर महाराष्ट्र विभाग सचिव पदावरून महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर, श्री जगन्नाथ रासवे यांची मराठवाडा विभाग अध्यक्ष पदावरून महाराष्ट्र राज्य संघटक पदावर, श्री राहुल कुलकर्णी यांची उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष पदावरून उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष पदावर, श्री संतोष लांडे यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदावरून पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक पदावर, श्री अभिजित क्षीरसागर यांची नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदावरून नागपूर जिल्हा अध्यक्ष पदावर, श्री आसाराम वीरकर यांची छ. संभाजीनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदावरून छ. संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष पदावर, श्री संतोष रासवे यांची जालना जिल्हा अध्यक्ष पदावर आणि श्री किशोर गुडेकर यांची अंधेरी तालुका अध्यक्ष पदावरून मुंबई जिल्हा संघटक पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत.

यावेळेस विशेषत्वाने समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सामाजिक, संघटनात्मक आणि माहिती अधिकार कार्याचा गौरव म्हणून श्री जगन्नाथ रासवे, श्री जगदीश बावस्कर, श्री संतोष लांडे, श्री सारंग महाजन, श्री युवराज साळवे, श्री रमेश बाहेती, श्री राजेंद्र सतई, श्री मनोज उराडे, श्री शैलेश मालपुरे, श्री आसाराम वीरकर, श्री किशोर गुडेकर, श्री समाधान पाटील, श्री अशोक म्हस्के, श्री राजू शिंदे, श्री निवृत्ती गायके, श्री अभिजित क्षीरसागर, श्री दीपराज इलमकार, श्री धनंजय ताटपल्लीवार, श्री गणेश तारू, श्री राहुल कुलकर्णी श्री स्वप्नील जोशी, श्री शंकर शिंदे, श्री सुरेश धारे, श्री काशिनाथ भालेराव, श्री महादेव सुरशे, श्री ऋषिकेश सुरशे , श्री रमेश सुरसे, गौरव काळे यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.

 समितीच्या कार्यात येणाऱ्या अनुभवाचे दृष्टीकोन श्री राजेंद्र सतई, श्री अभिजित क्षीरसागर, श्री सारंग महाजन, श्री रमेश बाहेती, श्री आसाराम वीरकर यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र यांचे वाटप करण्यात आले.

 समितीस जोडू इच्छिणाऱ्या नवीन सभासदांनी श्री महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ९७६६३६६६११, श्री जगन्नाथ रासवे महाराष्ट्र राज्य संघटक ९४२१६४२४६४ व संतोष लांडे ९१७५९४१२९४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.