🔸घोडपेठ तलावातील दुर्देवी घटना
✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.13 एप्रिल) :- तालुक्यातील घोडपेठ येथील तलावात मासेमारी करीता गेलेल्या युवकाचा मासेमारीसाठी वापरण्यात आलेल्या हवा भरलेल्या ट्यूबवरून तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.11 एप्रिलला दुपारी एकच्या दरम्यान घडली. मृतक युवक हा आर्थिक दुर्बल घटकातील असून त्याला पत्नी , दीड वर्षाची मुलगी व म्हातारे आई-वडील आहेत. 28 वर्षीय अंकुश रमेश नागपुरे हा कुटुंबातील कमावता एकमेव व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे नगर सेवक नरेन्द्र पढाल यांनी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रविंद्रे शिंदे यांच्याकडे मयत यांच्या परिवाराची हलाकीची आर्थिक परिस्थीतीची व्यथा मांडली.
लगेच अध्यक्ष रविंद्र शिंदे व संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराजजी आस्वले यांनी दखल घेत तात्काळ ट्रस्टच्या मार्फतीने त्यांच्या पत्नीस व दीड वर्षीय मुलीस आर्थिक मदत देण्यात आली. एवढेच नव्हे तर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या कुटुंबीयास जर काही शासकीय योजनेचा लाभ काही मिळत असतील तर त्यासाठी आमच्या कडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल असे त्यांनी सांगून कुटुंबाचे सांत्वन केले.
संस्था स्थापनेपासून बहात्तर वर्षाच्या काळात मासेमारी करत असताना संस्थेच्या सभासदाची पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पहिल्यांदाच घडल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी अंकुश चे म्हातारे आई-वडील पत्नी दीड वर्षीय मुलगी उपस्थित होती. सोबत हनुमान वार्डातील बहुसंख्य नागरिक तथा नगरसेवक राजू सारंगधर, नगरसेवक नरेंद्र पढाल, सामाजिक कार्यकर्ते, दिलीप मांढरे, गौरव नागपुरे आधी उपस्थित होते.