माढेळी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.11 ऑगस्ट) :-चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन माढेळी येथे दिनांक ११ जुलै २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात होते.

या शिबीराला माढेळी,पवनी,जळका,येवती,वाघनख,सोईट,निलजई,आमडी,बोरी,पांझुर्णी, या गावातील १०००नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.

 या कार्यक्रमाचे उदघाटन मा.देवानंद महाजन,सरपंच माढेळी यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख मा.गणेश माटे,सरपंच बोरी,मा.प्रदिप पाल उपसरपंच आमडी,मा.वनिताताई हुलके उपसरपंच, माढेळी.मा.सुगंधाताई बोढाले सामाजीक कार्यकर्ता जळका हे मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक संकेत गोहकार. संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन कुणाल तुराणकर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय चंद्रपूरची सर्व टिम व संदिप सोनेकर,प्रशांत बोढाले,भास्कर मोर्हुले,कीशोर जगताप,रामभाऊ ताजणे,नितेश बोढाले,कार्लेकर,प्रविण वासेकर,शुभम चिमूरकर,भोजराज ठाकरे,ब्रम्हानंद कुळसंगे,ग्राम पंचायत माढेळी व ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले.