माढेळी येथे चष्मे वाटप संपन्न

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.5 सप्टेंबर) :- गुरुदृष्टी नेत्रालय तर्फे चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत विर्दभातील सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन मोफत डोळे तपासणी शिबीर खांबाळा येथे ११ आॅगष्टला संपन्न झाले होते त्यातील ५२३ लार्भार्थ्यांना आज दिनांक ५ सप्टेंबरला चष्मे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे उपस्थित होते.प्रमुख उपस्थिती मध्ये रामभाऊ ताजणे,चंपतराव राऊत,शांताबाई आत्राम,गजानन चांदेकर उपस्थित होते.

प्रास्ताविक सुधाकर खरवडे,संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रशांत बोढाले यांनी केले.

या कार्यक्रमाला यशस्वि करण्यासाठी अनुप खुटेमाटे,चेतन किन्हेकर,सचिन खुटेमाटे यांनी अथक प्रयत्न केले.