माजी नगरसेविका सौ. संगीता खांडेकर यांच्‍या हस्‍ते विठ्ठल मंदिर प्रभागात अंडरग्राऊंड नाली बांधकामाचे भूमीपूजन संपन्‍न

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.12 ऑगस्ट) :- चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथे दि.११.०८.२०२४ रविवारला सायं. ०५.०० वा. विठ्ठल मंदिर प्रभागातील मारपीट चौक येथे महानगरपालिकेच्‍या नगोध्‍दन या निधीमधून २५ लक्ष रुपये अथक प्रयत्‍नाने मंजुर करुन अंडरग्राऊंड नालीचे भूमीपूजन माजी नगरसेविका सौ.संगीता खांडेकर यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले.

अंडरग्राऊंड नाली हनुमान चौक चनकापूरे यांच्‍या घरापासून मारपीट चौक, भाग्‍यलक्ष्‍मी किराणा पर्यंत तर शांताराम गर्गेलवार ते मोडकवार ते नागपूरे यांच्‍या घरापर्यंत अंडरग्राऊंड नाली बांधकाम करण्‍यात येणार आहे. तरी या भूमीपूजन कार्यक्रमाला विठ्ठल मंदिर प्रभागातील असंख्‍या पुरुष-महिला उपस्थित होते.

मदन पडगेलवार, शांताराम गर्गेलवार, राजु पडगेलवार, विनोद पडगेलवार,अंकुश रासेकर, बबन कोंडावार, प्रकाश पडगेलवार, शिलाबाई पडगेलवार, बरबटकर ताई, पडगेलवार ताई, वच्‍छलाबाई गाडगीडवार व वार्डातील असंख्‍य नागरीकांनी भूमीपूजन कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली.