माजरी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.17 ऑगस्ट) :- चला बदल घडवुया अंर्तगत सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन गुरुदृष्टी नेत्रालय,चंद्रपूर च्या वतीने माढेळी येथे रविवार दिनांक १८ आॅगष्ट २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन मा.छायाताई जंगम सरपंच माजरी यांच्या हस्ते होत असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाॅ.चेतन खुटेमाटे राहणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणुन मा.प्रविण सुर,गोपाल ढवस,पप्पु खान,सुचिता ताजणे,सुनिल खामनकर,अरुण तिखट,विजय खंगार,स्वप्निल वासेकर,बंडू महातळे,विरेंद्र वानखेडे,प्रमोद आवारी,देवराव तोडासे,महेश मोरे,प्रदिप हेकाड,विनायक चट्टे,अंकुश मेश्राम,जलालउद्दीन शेख,रविभाऊ इंगोले हे मान्यवर उपस्थित राहणार असुन सदर शिबीराचा लाभ माजरी परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.