माउंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूरचा एच एस सी परीक्षेत १००%निकाल

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.22 मे) : –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. चंद्रपूर मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित माउंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूरने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी १००% टक्के निकाल लावत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश प्राप्त केले. 

महाविद्यालयातील सच्चक संजय कांबळे यांनी ८९ % गुण प्राप्त करत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर महावीरजयसिंग गुरोन हा८८% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून द्वितीय आला. तर तृतीय क्रमांक कु.कनक कुशवाह हिने ८७.५०% गुण संपादन केले. शोभाशिष चांदेकर ८५.८३% गुण प्राप्त करत महाविद्यालयातून चौथा आला. तर पाचव्या स्थानावर कु.सृष्टी कावळे ८५.६७% गुण प्राप्त केले. एच एस सी बोर्ड परीक्षेत महाविद्यालयातून २४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यातून २८ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह गुण प्राप्त केले. आणि 130 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री भाऊराव झाडे तसेच संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शैलेश झाडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.श्री. राकेश साटोणे, प्राध्यापक श्री नंदकिशोर काकडे, प्राध्यापक श्री लुकेश लोधे, प्राध्यापिका कु. प्रीती मंदावार, प्राध्यापिका सौ स्मिता दोरनालवार, प्राध्यापिका सौ सरोज काकडे, प्राध्यापिका कु. रूपाली जीवने, श्री तुषार आसुटकर ,श्री प्रशांत वरारकर शिक्षक इतर कर्मचारी तथा पालक वर्ग उपस्थित होते.