माउंट कॉन्व्हेन्ट मूल गणराज्य दिन उत्साहात साजरा

✒️मूल (Mul विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

मूल(दि.26 जानेवारी) :- माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मूल येथे 76 वां गणराज्य दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मणहून संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे दिशा फाउंडेशन चंद्रपूर सुधाकर शेषराव काकडे निवृत वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सी टी पी एस चंद्रपूर,डॉक्टर पूजा महेशकर तालुका वैद्यकीय दवाखाना, अशोक उपरे प्रतिष्ठित नागरिक चंद्रपूर,

भारती राखडे अध्यक्ष पालक शिक्षक समिती ,रिमा कांबळे मुख्याध्यापक, अशपाक सय्यद उपमुख्याध्यापक ,दुष्यंत गणवीर प्रभारी ज्युनिअर कॉलेज मूल, रोशन गुरणुले प्राध्यापक गोपाळ महाडोले प्राध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मूल, वेदांत चापडे विद्यार्थी प्रतिनिधी किमया खोब्रागडे विद्यार्थिनी प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमात वेगवेगळ्या कृती घेण्यात आल्या ज्यामधे विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर नुर्त्य, गीत, भाषण देऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यात आले.

पाहुण्यांनी भाषणातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले सोबतच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे गरजचे आहे.

विद्यार्थ्यांना विविध खेळांचे आणि सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली येनुरकर, राशी वासेकर, श्रेया गोंगले, नमोष्री गजभिये तर आभार प्रदर्शन विष्णू वाढई आणि सानिया पधरे यांनी केले.

कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी शिशक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मदत केली.

कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीतांनी झाली.