▫️ग्राहकाशी होणारे गैरवर्तन खपवून घेणार नाही .. निखिल चिंतामणी मांडवकर(Customer abuse will not be tolerated .. Nikhil Chintamani Mandavkar)
▫️युवा सैनिक आक्रमक(Young soldier aggressive)
✒️मनोहर खिरटकर खाबांडा(Khambada प्रतिनिधि)
खांबाडा(दि.3 ऑगस्ट) :- मागील बऱ्याच दिवसापासून महावितरण कंपनीच्या कारभारासंबंधी व खास करून बिलासंबंधी , विजेच्या लपंडाव संबंधी तसेच वरोरा शहर वितरण ग्राहक सेवेसाठी असणारा फोन सातत्याने बंद असतो अश्या बऱ्याच तक्रारी युवासेना वरोरा कार्यालय यांचेकडे प्राप्त झाल्या होत्या व उपाययोजना करण्यापेक्षा तेथील कर्मचारी हे अरेरावीचे उत्तर देत होते असे आढळले.
याच माध्यमातून युवा सेना आघाडी नेते निखिल मांडवकर यांनी जाब विचारण्याबाबत उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेतली वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू असून बिलासंबंधी समस्या बाबत ग्राहक कार्यालयात गेले असता.
ग्राहकाशी गैरवर्तन करने ग्रहकाशी व्यवस्थित न बोलने अश्या काही तक्रारी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्या होत्या . याचीच दखल घेत युवासैनिक निखिल मांडवकर यांनी महावितरण कार्यालय गाठून तेथील अधिकारी व कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरत ग्राहकाशी केलेल्या गैरवर्तनाबाबत जाब विचारला व ग्राहकांच्या समस्या न सोडवता ग्राहकाशी गैरवर्तन टाळले नाही.
तर शिवसेना आपल्या स्टाईलने याचा समाचार घेईल असा इशारा युवा सैनिक निखिल मांडवकर यांनी दिला आहे.. संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद देत भविष्यामध्ये सकारात्मक भूमिका घेण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले.