🔸पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ला दिले निवेदन(Statement given to Guardian Minister Sudhir Mungantiwar)
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.2 मे ) :-
1 मे महाराष्ट्र कामगार दिनाप्रसंगी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षक पालक एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कॉन्व्हेंट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांच्या पालकांचे संस्थाचालक व सरकारी कार्यप्रणाली विरुद्ध सत्याग्रह आंदोलन जटपुरा गेट येथील गांधी पुतळ्यासमोर करण्यात आले.
महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यम शाळा ,सीबीएससी, आयसीएसई, आयबी तथा स्टेट बोर्डाच्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा पालकांचे होत असलेले शोषणाविरोधात सरकारला जाणीव करून देण्याकरिता हे आंदोलन करण्यात आले.
कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्यात यावे, महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रसूती पूर्व रजा वेतनासह देण्यात याव्या, शाळा सोडून गेलेले किंवा निवृत्त झालेले शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार पीएफ व ग्रॅच्युईटीचा लाभ देण्यात यावा, कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना सी एल व ई एल तथा वैद्यकीय रजा नियमानुसार देण्यात याव्या, कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेत असलेल्या गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांन करिता सरकारने राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना चालू करावी, अल्पसंख्याक शाळेत आरटीई अंतर्गत 25% विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अल्पसंख्याक शाळेचा अल्पसंख्याक दर्जा सरकारने नियमानुसार तपासून बघावा तसेच महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी माध्यम शाळा व अल्पसंख्यांक कॉन्व्हेंट स्कूल येथील आर्थिक व्यवहार शासनाने तपासून बघावा, आर्थिक व्यवहार तपासण्याकरिता शासनाने एसआयटी गठीत करावी अशा प्रमुख मागण्याचा यात समावेश आहे.
या मागणीचे निवेदन चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. त्यांनी शिक्षण मंत्र्यांची या विषयावर बोलण्याचे आश्वासन देऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे म्हटले.या आंदोलनास जनविकास सेना, बहुजन समाज पार्टी, पुरोगामी शिक्षक संघटना ने पाठिंबा दर्शविला होता.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक पालक एकता मंच तर्फे विवेक आंबेकर , संजय उपाध्ये , किशोर मोहुरले , प्रवीण कडू श्री मोहन ठाकुर, नन्दकिशोर आसुटकर, संजय कोतपल्लीवार, संपतराव इल्लनदुला, दर्शिका रामटेके, सुजाता मोहरील, स्नेहल बाम, संदीप बैस, बाबाराव ठावरी, रवी गजरलावार, नरेंद्र इटनकर, सुनील माहोरे ,शुभांगी डोंगरवार, विभावरी डोंगरे ,रामटेके सर व कॉन्व्हेंट शाळेतील बहुसंख्य शिक्षक व पालक वर्ग सहभागी झाले होते .