✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)
बुलढाणा(दि.7 जुलै) :-
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र चिखली च्या वतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त चिखली येथील एस .टी. आगार वर्कशॉप येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र कामगार कल्याण चिखलीच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन नेहमीच केले जाते. वातावरणातील होणारा बदल लक्षात घेऊन वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री इलामे साहेब आगार व्यवस्थापक श्री सागर परदेशी वाहतूक निरीक्षक श्री भारत भाऊ हाडे ,श्री गजानन बांडे ,श्री गजानन परिहार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला एसटी महामंडळातील कामगार उपस्थित होते.
कामगार कल्याण मंडळ चिखली केंद्रप्रमुख श्री अनंता मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता केंद्र कर्मचारी श्री प्रल्हाद बांडे ,सौ .सीमा बांडे, संतोष खंडेराव, गणेश जगताप यांनी अथक परिश्रम घेतले .वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरिता संपन्न झाला.