महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील महाकाली यात्रेला प्रारंभ Mahakali yatra begins at chandrapur in Maharashtra 

🔸करोडो भाविक भक्ताची होणार अलोट गर्दी

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.29 मार्च) :- संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले चंद्रपूर येथील माता महाकाली हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मराठवाड्यातील नागरिकांचे तसेच भाविक भक्ताचे हे श्रद्धास्थान आहे.

इथे दरवर्षी चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमा तील संपूर्ण महिना या महाकाली देवीचा जागर केला जात असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मराठवाड्यातील भाविक इथे नतमस्तक होण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होतात.    

         विशेष म्हणजे चंद्रपूर येथील महाकाली मंदिर हे पुरातन असून या मंदिराचे रहस्य अधिक महत्वपूर्ण आहे याची इतिहासात देखील नोंद आहे . माता महाकाली देवी हे महाराष्ट्रातील भाविक भक्ताचे जागृत देवस्थान आहे . तर ही देवी नवसाला पावत असून अनेक नागरिक भाविक भक्तगण आपल्या श्रद्धा घेऊन येथे येत असतात  व आपले नवस फेडून दरवर्षी मोठया प्रमाणात येत असतात.

  वर्षातून दोन वेळा नवरात्री महोत्सव , व चैत्र पौर्णिमा चैत्र महिना या काळात मंदिरात भव्य जत्रा भरते . व भाविकांची अलोट गर्दी असते तर देवीच्या दर्शना करिता देवीचे भक्त सकाळ पासून तर रात्रौ पर्यंत रांगेत उभे असतात.

यांच्या सेवे करिता मंदिराच्या ट्रस्टी कडून तसेच चंद्रपूर प्रशासन तर्फे अनेक सुख सुविधा उपलब्ध करून देत असतात .. या वर्षी देखील इथे येणाऱ्या राज्यातील तसेच पर राज्यातील देवीच्या भक्तांसाठी अनेक सुख सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे .