महाराष्ट्राची हास्य जत्रा मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आज चिमूर नगरीत पदार्पण

🔸रक्षाबंधनाचा भव्य कार्यक्रम

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)

चिमूर (दि.24 ऑगस्ट) :- भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आकर्षण महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सह आमदार बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून मोठया संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे यांनी केले आहे.

 दरवर्षी प्रमाणे आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून दिनांक २४ ऑगस्टला शनिवारी दुपारी १२:०० वाजता रक्षाबंधन कार्यक्रम स्थळ गदगाव रोड कडील चिमूर कॉटन इंडस्ट्रिज (कॉटन मिल ) च्या परिसरात घेण्यात येत आहे.

या कार्यक्रमास महिलांच्या खास भेटीला मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, आमदार बंटी भांगडिया व इतर मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे.

 यावेळी भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे, प्रदेश चिटणीस ममता डुकरे, दुर्गा सातपुते आशा मेश्राम, गिता लिंगायत, वर्षा शेंडे, भारती गोडे, प्रतिभा गेजिक, वैशाली चन्ने, कल्याणी सातपुते, नसीमा शेख रत्नमाला मेश्राम, छाया कंचर्लावार अरुणा नन्नावरे यांनी चिमूर तालुक्यांतील महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.