🔸राळेगाव येथे बुद्ध मूर्तीचे तसेच विहाराचे थाटात उद्घाटन
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बु (दि.16 एप्रिल) :-
स्थानिक राळेगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्याने सर्व सहयोगी दान दात्याच्या सहकार्यातून अथक परिश्रमातून राळेगाव येथे बुद्ध विहाराची तसेच भगवान बुद्ध मूर्तीचे अनावरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
तसेच भीम जयंतीचे ओचित्य साधून दोन दिवसीय भव्य कार्यक्रम देखील घेण्यात आला. तर दिनांक १४ तारखेला सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण , बुध्दमूर्तीचे अनावरण भंते धम्मचेती संघारामगिरी तसेच त्यांचा भिक्षुसंघ यांच्या हस्ते करण्यात आले..
तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच मार्गदर्शक म्हणून श्री अविनाश मेश्राम ठाणेदार शेगाव पोलीस स्टेशन , श्री शंकरभाऊ भरडे साहित्यिक लेखक , श्री माधव जीवतोडे , विजय काळे मंडळ कृषी अधिकारी वरोरा , श्री अशोक भिमटे माजी सरपंच राळेगाव , आदी मान्यवर उपस्थित होते . त्यानंतर रात्रौ धम्मरॅली भव्य मिरवणूक काढण्यात आली . व रात्रौ ९ वाजता बुद्ध भीम गीताचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक श्री राजहंस डांगे यांनी सादर केला.
तर यांच्या गायनातून भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश झोतणाऱ्या गीतांनी राळेगाव वासीय मंत्रमुग्ध झाले. तर दिनांक १५ तारखेला सकाळी बुद्धवंदना , बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून श्री रमेशजी राजूरकर सां. का. वरोरा ,श्री अविनाश मेश्राम ठाणेदार , श्री दयाराम नन्नवरे, सभापती आ. वि. सं.सोसायटी चारगाव बूज . श्री अभिजीत पावडे उपसभापती , श्री पुंडलिक नन्नावरे सरपंच .संभाजी कांबळे , रविंद्र थुल , इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
तर या निमित्याने भव्य भोजनदानाचे देखील आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विकास थूल , रवींद्र थूल , नारायण थूल , राजहंस डांगे , जितेंद्र थूल , प्रवीण बागेसर तसेच सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले....