मनसे तर्फे आज पिक विमा व कर्जमाफी साठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 

🔸मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन 

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.18 सप्टेंबर) :- गतवर्षी सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे भरपूर मोठ्या प्रमाणात कापसाचे नुकसान झाले तसेच यलो मोझ्याक रोगामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते,तरिही शासनाने व पिक विमा कंपन्यांनी झालेल्या पिक नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली नाही.

सरकारने २०१६ मध्ये छञपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली नंतर तिच योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सुरू केली तरिही बव्हंशी लोकांना शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी निवेदनाद्वारे अनेकदा मागणी केली होती तरीही सुद्धा शासन प्रशासनाने डोळेझाक केली म्हणून दिनांक १९/९/२०२४ला तहसील कार्यालय वरोरा समोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे याकरिता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी व मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.