मनरेगा अंतर्गत चिमूर विधानसभा क्षेत्रात ४ कोटी १० लक्ष रूपयाचे विविध गावातील विकास कामाला मंजुरी

🔸आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाला आले मोठे यश

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)

चिमूर(दि.9 ऑगस्ट) :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना चिमूर विधानसभा क्षेत्रात मनरेगा अंतर्गत विविध गावातील सिमेंट रस्ता कामाच्या ४ कोटी १० लक्ष रूपयाचे निधी मंजूर करण्यात यश प्राप्त झाले. यात चिमूर विधानसभा क्षेत्रातील आमडी मदन ते हनुमान मंदिर पर्यत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष,उसळमेंढा येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,कन्हाळगाव येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष,कवडशी (देश )पुष्पकला बावणे ते वंजारी यांचे घरा पर्यत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,कोसंबी गवळी येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, कोर्धा येथे सिमेंट रस्ता करण्यासाठी १५ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले‌.

खडसंगी येथील मेन रोड ते मधुकर बनसोड यांचे घरा पर्यत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, खांबाडा येथील हेमंत गौरकर ते हनुमान मंदिर पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,गिरगांव येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, तळोधी येथील रमेश जाभूळे ते मधु गिरी घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,देवपायली येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,नवतळा येथे घेरोबा मुंगणे ते ज्ञानेश्वर हजारे घरा पर्यत रस्ता करणे १५लक्ष रू,नवेगाव पांडव येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,पार्डी येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, पिंपळगाव येथील हनुमान मंदिर ते गुरुदेव सेवा मंडळ पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,बाळापूर (बु ) येथे रस्ता करणे १५लक्ष रू, बोडधा येथील हनुमान मंदिर ते प्रमोद नाकाडे घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,बोथली मधु कोसरे ते सूर्यभान नागपुरे घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,मिनथुर येथे सिमेंट रस्ता करणे २०लक्ष रूपये मंजूर करण्यात आले‌.

लोहारा येथील मधुकर मेश्राम ते सरकारी दवाखाना पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,वलनी मेंढा येथील सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,सिरपूर येथील शालिक डहारे ते रामभाऊ मोहिनकर यांच्या घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,शिवरा येथील मधु सावसाकडे ते सुरेश नन्नावरे यांच्या घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,सावरगाव येथील सिमेंट रस्ता करणे, योगेश नाकाडे ते विलास नाकाडे यांच्या घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,सावरी येथील विलास वाकडे ते रतीराम ठवरे घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,हेटी (गंगासागर ) येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू. अशा प्रकारे निधी मंजूर करण्यात आली आहे.

  आमदार बंटी भांगडिया यांनी मनरेगा अंतर्गत रस्ता कामे मंजूर केले असल्याने नागरिकांनी आभार व्यक्त करीत विकास कार्यावर समाधान व्यक्त केले.