मधु तारा प्रत्येकांसाठी प्रत्येक जण मधु तारा साठी

✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.4 सप्टेंबर) :- दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी ससून सर्वोपचार रुग्णालय महाराष्ट्र शासन पुणे येथे H I V बाधित रुग्णांसाठी BJMCICTC -1 विभागात मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 2 व्हीलचेअरचे सहकार्य वाटप करण्यात आले.

H I V विभागाच्या समुपदेशक सौ प्रज्ञाताई माने गोळसर यांच्या विनंती पत्रावरून हे व्हीलचेअर वाटप करण्यात आले.

या वेळी ससून हॉस्पिटलचे डीन – अधिष्ठाता डॉ श्री एकनाथजी पवार सर. सुप्रिडेंट – प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ श्री यलाप्पाजी जाधव सर.सामाजिक विभागाचे अधीक्षक डॉ श्री शंकर मुगावे सर.सूक्ष्मजीव शास्त्र विभाग प्रमुख.H O D डॉ श्री राजेशजी कार्यकर्ते सर.इन्चार्ज सूक्ष्मजीव शास्त्र विभाग.डॉ श्री आशिषजी सदाफले सर.प्रयोग शाळा तंत्र्ज्ञ वैशाली औंधकर.प्रयोग शाळा तंत्रज्ञ.मंजुश्री शेठे.श्री रवींद्रजी तापकीर सर.टेक ऑफिसच्या गौरी येरडे. तसेच मधु तराचे पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे.पुणे शहराध्यक्ष दिव्यांग विभाग श्री अक्षयजी श्रीगादी.महिला दिव्यांग विभाग पुणे शहराध्यक्षा सौ. मीनाक्षीताई शिंदे. स्मिताताई वाघोले.सौ. शोभाताई सांगळे.श्री विनयजी सदनापुरकर. कु.श्रद्धा सांगळे. तसेच सौ प्रज्ञाताई यांच्या सह सर्व स्टाफ या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी सर्वांनी मधु ताराने केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन करत कृतग्नयता व्यक्त केली व ससून हॉस्पिटल सदैव मधु तारा सोबत आहे .असे म्हंटले 

या वेळी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी या पवित्र कार्यासाठी आपण मधु ताराला जी संधी दिली त्या बद्दल संपूर्ण ससून हॉस्पिटलचे आभार व्यक्त आम्ही व आमची मधु तारा टीम करीत आहोत असे म्हणाले.