मधुतारा फाउंडेशन चा अजून एक नवीन उपक्रम

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधी)

पुणे (दि.3 ऑगस्ट) :- 

दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मधु तारा कांदिवली पश्र्चिम प्रमुख श्री विक्रमजी माने यांच्या सहकार्याने कोकण येथील रायगड जिल्ह्यातील श्रीमती बालीबाई जोमा पाटील यांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

नवीन पनवेल नवी मुंबई येथील आर झून झुन वाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

या वेळी पाटील परिवाराने मधु तारा आणि हॉस्पिटल प्रशासन यांचे आभार व्यक्त केले.