मंगलमय दिनानिमित्त मंगळवारी काव्यसंग्रह कवियत्री च्या चाहुलखुणा

✒️ संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.14 जून) :- 

मंगळवार दिनांक :- ११ – ६ – २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता कार्यक्रम सुरू झाला, जशी पावसाची चाहुल लागते , येणाऱ्या नव्या बाळाची चाहुल लागते , तशीच आज एका अत्तरामध्ये व अक्षरामध्ये जन्म घेणाऱ्या या एका नव्या कवयित्रीच्या ” चाहुलखुणा ” आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत , चला तर मग त्याचे या नव्या प्रवासात स्वागत करूया…!

    आज प्रज्ञा पळसुले यांच्या नव्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा डोंबिवली येथे गणेश मंदिर , विनायक हॉल येथे संपन्न झाला…! 

    या प्रसंगी प्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , अध्यक्ष डॉ.गिरीश लटके , प्रमुख अतिथी डॉ.संगीता गोडबोले , डॉ.नंदकुमार सावंत , श्रीमती राजेश्री पोतदार , श्री रविकिरण पराडकर हे मान्यवर उपस्थित होते, सुत्र संचालन – अभिनेते श्री मकरंद पाध्ये यांनी कवितेच्या माध्यमातून रसिक जणांचे मने जिंकले . या कार्यक्रमाला अनेक मान्यवर व साहित्यिक , रसिक यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती , अनेक मान्यवर कवींनी आपले मनोगत व्यक्त करत रसिकांची सुध्दा मने जिंकली.. ! 

रसिकांसाठी ” चाहूलखुणा” हे ऑनलाईन विक्रीस लवकरच येतंय…व आता सध्या कोणाला हवे असल्यास या +91 77180 23236 नंबरवर संपर्क करावा…!