भोलू कष्टि याच्या नेतृत्वात तलाठीची झालेली बदली रद्द करा साठी तालुका उपविभागीयांना दिले निवेदन शेतर्यानसह , सामाजिक संघटना एकवटल्या

✒️मनोहर खिरटकर(खाबांडा प्रतिनिधि)

खांबाडा(दि.24 ऑगस्ट) :- वरोरा तालुक्यातील खांबाडा साजा क्र .२२ ला असलेल्या महिला तलाठी राखी टिपले यांची शासकीय नियमाप्रमाणे झालेली बदली रद्द करण्यासाठी खाबांडा साजातील भोलु कष्टि यांच्या नेतृत्वात शेतकरी एकतेने तालुका उपविभागीय अधिकारी यांना विनंती पुर्वक निवेदन दिले .

ग्रामीण भागातील अधिकारी कसा असावा तर सर्वसामान्याचा हिताचा खांबाडा साजाला असलेल्या तलाठि कुमारी राखि टिपले ह्याचे कार्यसुद्धाअसेच तलाठी कार्यालयात विद्यार्थी,महिला असो किंवा सर्वसामान्य शेतकरी त्याचे कामे तत्परतेने करून देत असल्याने सर्वाना त्यांचा आदर वाटतो ते एक शासकीय अधिकारी नसून ती आपली शेतकरी कुंटुंबातील एक सदस्य समजायचे त्याच्या बद्दल शेतकरी बांधवाना आपली मुलगी,बहिण असावी या प्रमाणे त्यांची वागणुक असल्याने खाबांडा साजातील सर्व शेतकरी बांधवा सोबत गावातील सामाजीक संघटना,गुरुदेव सेवा मंडलाचे पदाधिकारी, माँ भवानी क्रिंडा मंडलाचे पदधिकारी तर खांबाडा गावच्याविद्यमान उंपसंरपंच नलु थुटेसह दुषांत ताजने,शुभम भोयर, सुनिल भोयर,विनोद डुकरे,जितेन्द्र कष्टि,वंसता बादणे,संतोष उरकुडे,पिंटु देठे,विशाल देवतले,प्रफुल थुटे,आकाश भांडे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.