🔹काम निष्कृष्ट असल्याचा नागरिकांचा आरोप
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.15 जून) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या भेंडाळा गावात ग्राम सडक योजने अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत भेंडाळा ते वरोरा चिमूर महामार्ग शेगाव चौरस्ता पर्यंत डांबरीकरण रस्त्याला मान्यता मिळाली असून गेल्या काही दिवसापासून रवाडी गिठ्ठी पसरविण्यात आली व दोन दिवस पासून डांबरीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे . परंतु या कामात पूर्णतः गैरव्यवहार होत असून रस्ता अत्यंत निष्कृश्ट दर्जाचा केला जात असल्याचे नागरिकांना दिसताच गवकऱ्यनी हे काम बंद पाडले .
सविस्तर असे की या रस्त्यानिर्मिती करिता याचे कंत्राटदार आपली मनमानी करून रस्ता अत्यंत निषकृष्ट दर्जाचा करून सर्वस्वी रक्कम हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे रस्त्यावर डांबरी थर हा किमान पाच ते सहा इंच असणे गरजेचे असताना देखील फक्त अर्धा इंच तसेच एक इंचीचा थर करून झपाट्याने रस्त्याची निर्मिती केली जात आहे .
आताच पहाले असता डांबरखली मोठी रवाडी दिसत असून याचा कालावधी पाच ते सहा महिन्याचा असल्याचा दिसते. व एका वर्षातच या रस्त्याचे तीन तेरा वाजून काही दिवसातच मोठ मोठे खड्डे पडणार. असल्याने एकदा झालेले काम पुन्हा होणार नाही या करिता गावकऱ्यांनी काम रोखले .
उत्कृष्ट दर्जाचा डांबरी रस्ता निर्माण करावा अशी मागणी केली या करिता शासनाकडून लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे परंतु या रस्त्याची निर्मिती करणारे कंत्राटदार स्वार्थापोटी भ्रष्टाचार करून अत्यंत निशकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करीत आहे. तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेत रस्त्याची पाहणी करून सदर कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी येथील काँग्रेस चे युवा कार्यकर्ते श्री यशवंत लोडे , श्री लोकेश वाळके उप सरपंच भेंडाळा, श्री विजय ढोक ग्राम पंचायत सदस्य , पंढरी वाभीटकर , संतोष गणवीर तसेच अनेक गावकरी यांनी केली आहे.